महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संबंधित समीक्षा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संबंधित समीक्षा

        महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला परीक्षेला बसणारे उमेद्वावार "आयोग" असे थोडक्यात संबोधतात, हि एक महाराष्ट्र शासनाची विविध पदे भरण्यास महाराष्ट्र शासनाला मदत करणारी स्वायत्त संस्था आहे. मा. आयोगाने काळानुरूप  आपल्या परीक्षेच्या स्वरुपात बदल घडवलेले आहेत. त्यातच नुकताच केलेला बदल म्हणजे ओन्लाईन पूर्वपरीक्षा व वर्णनात्मक म्हणजे लेखी परीक्षा.

स्पर्धा परीक्षांचे अर्थ शास्त्र
           मित्रहो, आजचा कल लक्षात घेतल्यास हे तर दिसूनच येते की, माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) क्षेत्रात, एकूणच काय तर खाजगी क्षेत्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपलेच अनेक मित्र, ओळखीचे खाजगी क्षेत्र किंवा स्वताचा व्यवसाय या क्षेत्रात उत्तम प्रगती हि करत आहेत. मग प्रश्न उरतो की, ज्यांनी एक करिअर म्हणून स्पर्धा परीक्षा हा मार्ग निवडला आहे, त्यांनी आजची मार्केट डिमांड लक्षात घेऊन काय केले पाहिजे? काय त्यांनी आपल्या अप्रोच मध्ये बदल केला पाहिजे? नवीन येणाऱ्या मुलांना काय सल्ला दिला पाहिजे? हाच काय तो आजच्या मंथनाचा भाग.
         कोणतेही क्षेत्र आले म्हणजे स्पर्धा आलीच. आर्थिक, सामाजिक या निकषांवर व्यक्ती जेव्हा पूर्णतः सजग व सबळ असेल तेव्हाच त्याला पुढे अजून काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षा करणे म्हणजे सोप्या शब्दामध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढवणे हे होणे मुळीच व्यक्तिशः मला न पटणारे आहे. आपण प्रत्येकाने आपण जे काम करतो त्यात अर्थशास्त्र, समाजशास्त्र शोधत असले पाहिजे. तेव्हाच आपण त्या क्षेत्रात लंबी रेस के घोडे होऊ शकतो. 
            जे सद्या सरकारी पेशामध्ये काम करत आहेत, त्यांना तर वेगळीच अडचण असते. स्वतःला जे पद पाहिजे असते ते मिळालेले नसते. नवीन पोस्ट काढायची म्हणजे पुन्हा अभ्यास करणे, त्यासाठी वेळ काढणे, आर्थिक परिस्थितीचा विचार करून नोकरी सोडावी? विनावेतन सुटी मिळेल काय? की सोडणे शक्य नाही म्हणून काम करताना अभ्यास करावा हे प्रश्न येतात. पुन्हा आजकाल चा झगमगाट मन विचलित करण्याची शक्यता नेहमीचीच. एकदा पगार व्यायला लागल्यावर पैसा येतो, त्याने नवीन चोचले येतात. अनेक मुले क्षमता असूनही संयम नसल्याने त्याच पदावर आयुष्य घालवत असल्याची आपण उदाहरणे पाहतोच. हा दोष वातावरणाचा असतो. मन हुरळून जाते. कारण पैशा सोबत भविष्यातील कल्पनांच्या महालाना पेव फुटतात. पण हे महाल आपलं आयुष्य अमुलाग्र बदलेल एवढे मोठे कधीच होऊ शकत नसतात. 
        क्रमशः...............

Comments